जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व पिक विमा मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही ..
– रविकांत तुपकर यांची गर्जना
सिंदखेडराजा
दि .२७ मे रोजी सिंदखेडराजा येथील संत सावता महाराज मंदिर सभागृह येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एल्गार सभा पार पडली, पावसाळ्यामध्ये शेती मशागतीचे कामे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती , सर्वप्रथम राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले , त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे भाषणे झालेल्या मध्ये .स्थानिक शेतकरी नेते कैलास मेहेत्रे . बाळू शेवाळे , गजानन चव्हाण ‘ राजाराम जाधव पंढरपूर ‘भोकरदन चे आदिनाथ वानखेडे ‘ शिवहरी वाघ छत्रपती संभाजीनगर,लक्ष्मणजी मोरे नांदेड प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी क्रांतिकारी शेतकरी संघटना ‘
त्याचबरोबर एडवोकेट शर्वरीताई तुपकर ‘युवा प्रदेशाध्यक्ष कसबे लातूर ‘एडवोकेट अश्विनी मेहेत्रे ‘
सहदेव लाड ‘ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले ‘ त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विरोधाकांचा चांगलाच समाचार घेतला ,काही लोकांना रविकांत तुपकर बनायचे आहे असे अनेकदा झाले असून विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यामुळे आरोप करत आहे ‘ काही नेत्यांनी नुकताच सिनखेडराजा येथे मोर्चा काढला होता त्यामध्ये माझ्यावर टीका करण्यात आली की रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना फोन लावून मोर्चाला जाऊ नका असे सांगितले आईची शपथ मला असले धंदे येत नसून ,मला फोन करायला सुद्धा वेळ नसून घरच्या कुटुंबातील लोकांची माझे चार चार पाच दिवस संवाद सुद्धा होत नाही ,
असे सुद्धा तुपकर यांनी सांगितले ‘ बावीस वर्ष संघर्ष करून इथपर्यंत पोचलो असून तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी लढा आमचं काही म्हणणं नाही अशी सुद्धा तुपकर यांनी सांगितले ‘
रविकांत तुपकर हा प्रामाणिक आहे कोणाची आतापर्यंत फसवणूक केली नसून त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यातील लोकांचे मला प्रेम आहे ‘ वाशी फाट्याजवळ माझा अपघात झाला परंतु जिल्ह्यातील लोकांचा भरभरून प्रेम असल्यामुळे मला काहीच झाले नाही , बुलढाणा येथे उभाटा गटाचा ट्रॅक्टर मोर्चे झाला यामध्ये एका नेत्यांनी माझ्यावर टीका करताना सांगितले की यांच्यामुळे उबाठा पक्षाचा उमेदवार पडला ‘ आमचे मते त्यांनी घेतली ‘ परंतु उबाठा गटाच्या
उमेदवारामुळेच मी पडलो असल्याचे तुपकर यांनी सांगितले ‘ जर वयस्कर नेत्यांनी दम मारला असता आज चित्र वेगळे असते , परंतु राजकारणाचं काय खरं नसतं जोपर्यंत सरणावर जाईपर्यंत हे म्हणतील मला एक संधी अजून द्या ‘ यावेळी उपस्थित होते एकच हशा पिकला,मागील तीन वर्षाचा लोकसभेचा रेकॉर्ड तपासा व नंतर माझ्यावर टीका करा अशी सुद्धा तुपकर यांनी खडसावले ‘ त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री ना . प्रतापराव जाधव यांचे सुद्धा चांगले तोंडसुख घेतले
प्रतापराव जाधव हे पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून बसतात पण साधे पीक विमा बद्दल कर्जमाफी बद्दल त्यांनी आतापर्यंत निवेदन दिले का ?
असा प्रश्नतुपकर यांनी उपस्थित केला ‘
केंद्रीय राज्यमंत्री यांनी आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याकरता ताकद खर्ची घालू नये त्यांनी केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पिक विमा बद्दल कर्जमाफी बद्दल बोलावे असे सुद्धा तुपकर यांनी म्हटले,
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांची वज्रमुठ तयार करण्यात येत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला भाग पाडू, जर सरकारला झेपत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू असे का सांगितले असा सवाल उपस्थित करून जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व राहिलेला पिक विमा मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहू ,
शेडनेट शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक लावून तसेच शेडनेट धारकांना सुद्धा पिक विमा लागू झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा लावून धरण्यातील ‘
विदर्भातील दौऱ्याची सुरुवात रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा येथील शेतकऱ्यांच्या एल्गार सभेतून केली ‘ महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ताकद उभी राहिली असून तुम्हाला कोणाच्या दारामध्ये मदत मागण्याची गरज नसल्याचे सांगत कोणतेही काम मला सांगा मी करायला तयार आहे ठणकावून सांगितले ‘
जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत मुंबईच्या कार्यालयामध्ये ठाम मांडून बसू असे तुपकर यांनी सांगितले ‘ यावेळी पीक विम्याच्या जमा झालेल्या पावत्या जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे देणार असल्याचे सांगत जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल आंदोलनाची दिशा लवकरच कळेल असे सांगत रविकांत तुपकर यांनी चौफेर फटकेबाजी केली .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पाटील भानुसे यांनी केले राष्ट्रगीताने एल्गार सभेची सांगता करण्यात आली .
या सभेला महिलांची सुद्धा संख्या लक्षणे होते हे विशेष ‘