22.5 C
New York
Sunday, July 27, 2025
spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्याबाई जयंती साजरी

विरंगुळा भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

देऊळगाव राजा.. मातृतीर्थ एक्स्प्रेस

देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा व जनसेवा सामाजिक संघटना आणि जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती विरंगुळा भवन येथे साजरी आयोजित करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री.बळीराम मापारी होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले श्री.प्रकाश अहिरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे समग्र जीवन गौरव पर प्रकाश टाकला.रामदास मांटे , गोविंदराव बोरकर यांचीही भाषणे झाले,तसेच यावेळी खडकपुर्णा प्रकल्पाचे सेवा निवृत्त अभियंता श्री.देविदास भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मापारी मामा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.तसेच नगर परिषद देऊळगाव राजाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपिक सैय्यद नजीर सैय्यद रज्जाक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी.श्री.म.ज.धुळे प्रकाश अहिरे ,कुलथे , घिके आप्पा, प्रा अशोक डोईफोडे , रामदास मांटे घनश्याम भंडारे, गोविंद भिकानाथ बोरकर, उपस्थित होते.

,,फोटो,,

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!