*”एक तास राष्ट्रवादीसाठी..” उपक्रम उत्साहात संपन्न*
पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनास हजर राहण्याचे आव्हान
देऊळगाव राजा :.. मातृतीर्थ एक्सप्रेस
आज देऊळगाव राजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवार ला घेण्यात येणारा “एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी” हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.यावेळी पक्षाचे तालुक्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम देऊळगाव राजा शहरात राबविण्यात आला. यामध्ये आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका निवडणुका संदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.तसेच येत्या 10 जून ला, बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह शिवाजीनगर पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास तालुक्यातील व शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले. यासाठी संपूर्ण राज्यातून पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आमदार – खासदार उपस्थित राहणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार he मार्गदर्शन करणार असल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ कोल्हे, सि. राजा तालुका अध्यक्ष राजेंद्र अंभोरे, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हरीश शेटे, गणेश बुरकुल, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, महेश देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सय्यद करीम, माजी नगरसेवक नवनाथ गोमधरे, पक्षाचे शहराध्यक्ष विजय खांडेभराड, विलास खराट, मंगल आंभोरे, बलवतसिंग बावरे, दिनकर जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.