देऊळगाव राजा तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी रामदास डोईफोडे
देऊळगाव राजा
,, मातृतीर्थ एक्सप्रेस
देऊळगाव राजा तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते रामदास डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी केली आहे,
रामदास डोईफोडे यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे , काँग्रेस पक्षाचे नेते रमेश कायंदे, यांना दिले आहे, काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते रामदास डोईफोडे यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. काँगेस पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात रामदास डोईफोडे सक्रीय सहभागी झाले आहेत,
,,फोटो,,
काँग्रेस तालुका अध्यक्षपदी रामदास डोईफोडे
