24.6 C
New York
Friday, July 25, 2025
spot_img
spot_img

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक शिबिर संपन्न

देऊळगाव राजा -.. मातृतीर्थ एक्सप्रेस

शहरातील नामांकित ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रिम स्कूल मध्ये शनिवारी संस्थापक प्रमोद घोंगेपाटील आणि मॅकमिलन प्रकाशन यांच्या पुढाकाराने शिक्षक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक मॅकमिलन पब्लिकेशन च्या अश्विनी गायकवाड आणि सचिन फुलंबरकर यांनी शिक्षकांना पाच तास मौल्यवान मागदर्शन केले.
शिबिरामध्ये अश्विनी गायकवाड मॅडम यांनी प्रत्येक विषयानुसार मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कशा प्रकारे शिकवावे, कोणत्या बाबींचा वापर करावा, विविध प्रयोग, शब्दांचे उच्चारण, कौशल्य विकास या गोष्टीचा वापर कसा करावा या बाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले.
NEP 2020, NCF-2023, 21st Century Skills, Sustainable Development Goals,Test Paper, Worksheet, Students Progress Reports, Audio-Video learning, अध्ययन-अध्यापनाचे बालमानसशास्त्र यावर चर्चा केली.
या प्रशिक्षण शिबिरातुन शिक्षकांना बऱ्याच गोष्टी शिकायला व प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या. शाळेचे संस्थापक प्रमोद घोंगे पाटील यांनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व बाबी प्रशिक्षणादरम्यान उपलब्ध करून दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रिया घोंगेपाटील, शरद घोंगेपाटील उपमुख्याध्यापिका स्वाती भालेराव, पर्यवेक्षक लक्ष्मण खांडेभराड यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!