*देऊळगाव राजा तलाठी कार्यालया भाग 3 साजा पिंपळनेर. अंभोरा. या भागा साठी शासकीय कोतवालाची नियुक्ती करा जय शिवसंग्राम संघटनेची मागणी,* *तहसीलदार यांना निवेदन*
तालुका प्रतिनिधी
देऊळगाव राजा तलाठी कार्यालय येथे भाग 3 मध्ये खाजगी व्यक्ती याच्या भरोशावर तलाठी कार्यालयाचे काम सुरू आहे दोन-तीन महिन्यापासून तलाठी कार्यालय कधी 11:00 वाजता तर कधी 12:00 वाजता उघडण्यात येते 4:00 वाजता बंद करण्यात येते, तलाठी कार्यालय हे खाजगी व्यक्तीच्या भरोशावर चालू आहे गोरगरीब जनतेचे व निराधार लोकांचे कामाला गती मिळत नाही खाजगी व्यक्तीकडून नागरिकांना जास्त पैशाची मागणी करून नागरिकाची व विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे काही दिवसावरच शाळा उघडणार आहे शाळेसाठी दाखले उत्पन्न दाखले कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी धावपळ सुरू राहाणार आहे या कामासाठी तहसीलदार साहेबांनी शासकीय कोतवालाची तलाठी कार्यालय येथे नियुक्त करावे, नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे काम सोयीचे होईल शासनाचा जी आर क्रमांक – संकीर्ण 2024/प्र. क्र. 363/ई-10 नुसार खाजगी व्यक्ती याची नियुक्ती करता येत नाही तरी साहेबांना विनंती ही शासकीय कोतवालाची नियुक्ती करावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले, निवेदनावर स्वाक्षरी तालुका अध्यक्ष जहीर खान शहराध्यक्ष अजमत खान युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे मुबारक चाऊस. आयाज खान पठाण. राजू गव्हाणे. साजिद खान.असलम खान. किशोर वाघ. राजेश भाग्यवंत. यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जय शिवसंग्राम संघटनेने केली महसूल कोतवालाची मागणी
