23.6 C
New York
Sunday, July 27, 2025
spot_img
spot_img

वाळूसाठी ऑनलाईन बुकिंग करावे….खनीजकर्म अधिकारी

*वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा*
*बुलडाणा, (जिमाका) दि. 11 :* नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे हिवरखेड पुर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथील गट क्रमांक 275 मध्ये वाळू डेपोमधून नागरिकांना वाळू विक्रीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा खनिजकर्म अधिकारी अजितराव जंगम यांनी केले आहे.
मंजुर निविदेनुसार प्रतिब्रास वाळूचा दर निश्चित करण्यात आला असून निविदेनुसार मंजूर दर 553.50+ स्वामीत्वधन 600 रुपये+डिएमएफ 10 टक्के 16.52 असे 1 हजार 230 रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. वाहतुक खर्च हा ग्राहकाकडे राहिल. नागरिकांनी वाळू नोंदणीकरीता ऑनलाईन पद्धतीने htpps://Mahakhanij.maharashtra.ov.in या संकेतस्थळावर सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवावे. दि. 9 जून 2025 चे सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाळू डेपोमध्ये जमा झालेल वाळू साठा ग्राहकांच्या नोंदणीसाठी दि. 12 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरु करण्यात येत आहे. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर ग्राहकांने 15 दिवसाच्या आत वाळू घेऊन जाणे बंधनकारक आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!