सावता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बोरकर
देऊळगाव राजा.. मातृतीर्थ एक्सप्रेससमाजकार्यासाठी समाज संघटन म्हणुन राज्यभर कार्यरत असलेले सावता परिषदेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते दीपक बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राज्याच्या कानाकोपऱ्यात सावता परिषद ही विस्तारलेली आहे. राज्यात माळी समाजाची सर्वात मोठी संघटना म्हणून सावता परिषद ही कार्यरत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी नुकतेच एका पत्राद्वारे सदर नियुक्ती केली आहे.
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा कल्याणराव आखाडे यांनी नुकतेच सावता परिषदेचे राज्यभरातील ३६ जिल्ह्याचे शिलेदार निवडले आहे. नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्री आखाडे यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सिंदखेडराजा मतदार संघातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उदयनमुख नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असलेले युवा नेतृत्व दीपक बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, यांच्या मार्गदर्शना नुसार महाराष्ट्र प्रभारी मयूरभाऊ वैद्य, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष राजगुरू, पांडुरंग कोठाळे, डॉ. राजीव काळे, नंदकिशोर झोरे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सावता परिषदेचे सामाजिक कार्य समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण लढा देऊ असा निश्चय नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दीपक आसाराम बोरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सावता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बोरकर
