24.6 C
New York
Friday, July 25, 2025
spot_img
spot_img

संत मुक्ताबाई पालखीचे जल्लोषात स्वागत

श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत संत मुक्ताबाई पालखीचे आगमन
विद बसर्भात शेवटचा मुक्काम देऊळगाव राजामधे
देऊळगाव राजा.. मातृतीर्थ एक्सप्रेस
संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याने ६ जून २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (कोथळी) येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. या वेळी हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात भाविकांनी उत्साहात स्वागत केले.पालखी ७५० किलोमीटरचा प्रवास करत ३३ दिवसांत पंढरपूरला पोहोचते. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची ही पालखी आहे.७ जून रोजी पालखीचे मलकापुर (विदर्भ) येथे, ९ जून रोजी बुलडाणा येथे, दि १४ जून रोजी दुपारी 3वाजता श्री बालाजी महाराज यांच्या पुण्यनगरीत प्रवेश केला आहे. आगमनाच्या वेळी टाळ मृदुंगाच्या गजरात फटाक्यांच्या आवाजात मुक्ताबाईचे संत धोंडीराज महाराज मराठा मध्ये शहरवासीयांना कडून स्वागत करण्यात आले शहरात वारकरी सालाबादप्रमाणे आदी माया मुक्ताई असते ..
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला सर्वप्रथम संत मुक्ताबाईच्या दिंडीला प्रवेशाचा मान मिळतो. पालखीमध्ये शेकडो वारकरी, दिंड्या, आणि सजवलेल्या रथासोबत उत्साही वातावरण असते. वारकऱ्यांसाठी ही पालखी वारी अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाते
यावेळी संत मुक्ताबाई पालखीचे दिंडी चालक स हरणे महाराज यांचा मार्गदर्शनाखाली योग्य शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक वारकऱ्यांची नोंदणी व नियम ठरलेले असतात
शहरातील  धोंडीराज महाराज मठामध्ये संत मुक्ताबाई पालखीसाठी वारकऱ्यांना मुक्कामाची सोय व गाव जेवण वारकऱ्यांसाठी देखील सर्व सुविधा व्यवस्था लोक सहभागातून मठामधे केली जाते .
चौकट
मुक्ताईचे दिंडी सोहळा पंढरपुरासाठी ३१७ वर्ष पुर्ण झाले आहे तर आज रोजी ३१८ वेळ वर्षं आहे . यामध्ये 4 मोठे टँकर असतात दोन पिण्याच्या पाण्याचे व दोन अंघोळीसाठी वापरण्यासाठी असतात 25 शौचालय असतात त्यामध्ये अंदाजे 50 महिलांसाठी व 50 पुरुषांसाठी असतात 8 टेम्पो वारकऱ्यांचे सामानासाठी असते नोंदणी व संपर्क माहितीसाठी 1 गाडी असते शासनाच्या ॲम्बुलन्स 2 ठिकठिकाणी असतात तर इतर वाहने 10 असतात सर्व वारकऱ्यांची नोंदणी पत्ता दिले जातात व अशा शिस्तबद्ध पद्धतीने संत मुक्ताबाई च्या पालखीचे नियोजन असते तर 1000ते 3000वारकरी पायी दिंडी मधे असतात.
यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त होता होमगार्ड ट्राफिक यांचे देखील नियोजन होते शहरातील आगमन प्रसंगीत प्रतिष्ठित व्यापारी लोकनेते बहुसंख्येने भक्तगण उपस्थित होता . परतीच्या वेळी असंख्य महिला सत्यनारांनी विदर्भ हद्द पर्यंत पायी सेवा दिली व पुढे जालना जिल्हात दि.15 ला पालखीने पुढे प्रस्थान केले.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!