21 जुन रोजी योग दिवस साजरा करताना माय भारत आणि योग संगम पोर्टल वर नोंदणी करा
,,,,, मुख्याधिकारी अरुण मोकळ
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राज.. मातृतीर्थ एक्सप्रेस
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आंतर राष्ट्रीय योग दिवस 21 जुन रोजी सर्वत्र मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. योग हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे, नियमित योगा केल्याने आरोग्य टिकून राहते, ताण तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते, या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश असून त्यानुसार कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 च्या निमित्ताने सर्व नागरिकांना व संस्थांना माय भारत आणि योग संगम या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.. या नोंदणीमुळे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना व्यापक स्वरूप मिळेल, आणि जास्तीत जास्त नागरिकांना यात सहभागी होता येईल.
माय भारत पोर्टल वर वैयक्तिक नोंदणी प्रत्येक नागरिकाला, विशेषतः तरुणांना माय भारत पोर्टल वर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे,या पोर्टलवर नोंदणी करून नागरिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेऊ शकतात, योग दिनाचे महत्व, योगाचे फायदे, आणि सामुदायिक सहभाग वाढविण्यासाठी ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.
योग संगम पोर्टल वर कार्यक्रम स्थळाची नोंदणी विविध संस्था, योग केंद्रे, शाळा, महाविद्यालये, आणि स्थानीक संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आंतर राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या ठिकाणाची नोंदणी योग संगम पोर्टल वर करावी, या पोर्टलवर कार्यक्रम स्थळाची नोंदणी केल्याने देशभरातील योग दिनाच्या कार्यक्रमाचे एकत्रीकरण करणे शक्य होईल, यामुळे लोकांना त्यांच्या जवळच्या योग कार्यक्रमाची माहिती मिळण्यास मदत होईल आणि योग दिनाचे आयोजन अधिक प्रभावी होईल, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
माय भारत आणि योग संगम पोर्टलवर नोंदणी करा मुख्याधिकारी अरुण मोकळ
