24 C
New York
Sunday, July 27, 2025
spot_img
spot_img

भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीवर आम्रपाली खरात

  • कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या बुलढाणा (दक्षिण) जिल्हा अध्यक्ष (महिला) या पदावर आयु. आम्रपाली दिलीप खरात यांची नियुक्ती
    देऊळगाव राजा.. चंद्रभान झिने
    भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या बुलढाणा (दक्षिण) जिल्हा अध्यक्ष (महिला ) या पदावर आयु. आम्रपाली दिलीप खरात यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. आयु. आम्रपाली दिलीप खरात ह्या अन्याय अत्याचार विरोधात निर्भीडपणे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्याचा वाढदिवस त्या गरजूंना अन्नधान्य, भोजन व इतर वस्तूंचे वाटप करून साजरा करतात त्यांभ्या या कार्यामुळे त्यांना अनेक संस्थानी सामाजिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्या विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात त्या मागील काही वर्षापासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. आम्रपाली दिलीप खरात जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!