महिला पत्रकारांकडून पत्रकार बांधवांना राखी; बंधुत्व व ऐक्याचा संदेश
देऊळगाव राजा .. मातृतीर्थ एक्सप्रेस परीवार
शहरातील विश्रामगृहावर दि.११ सोमवार रोजी महिला पत्रकारांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दुपारी ४ वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच ऑनलाइन माध्यमांशी संबंधित अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार गजानना तीडके सुरज गुप्ता ,मुशीरखान कोटकर , व अर्जुन आंधळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर महिला पत्रकारांनी पारंपरिक पद्धतीने ताट सजवून आपल्या सहकारी पत्रकार बांधवांना राखी बांधली. तांदूळ, कुंकू, अक्षता आणि मिठाई यांच्या साक्षीने राखी बांधत महिलांनी बंधुत्व, विश्वास आणि परस्पर सहकार्याचा संदेश दिला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भाषणातून पत्रकारितेतील ऐक्याची गरज अधोरेखित केली. “पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून, त्यामध्ये एकमेकांना साथ देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे मत सुनील मतकर ,,संतोष जाधव, सुषमा राउत वार्ताहरांनी व्यक्त केले. त्यांनी रक्षाबंधनाचा बंध हा फक्त नाते संबंधापुरता मर्यादित नसून तो परस्पर सन्मान आणि संरक्षणाचे प्रतीक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात शहरातील दैनिके, साप्ताहिके, न्यूज पोर्टल तसेच फोटो जर्नालिस्ट्स संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. . शेवटी उपस्थित सर्वांनी पत्रकारांमधील ऐक्य व सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.तर अशोक डोईफोडे यांनी ही पत्रकारांचे रक्षाबंधन ईतर ही ठिकाणी व्हावे व कायम संकल्पना राबविण्यात यावी असे मत व्यक्त केले .जेष्ठ महीला पत्रकार सुषमाताई राउत यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मत पत्रकार पुजा कायदे ,कीरण वाघ ,व उषा डोंगरे यांनी व्यक्त केले .तर महीला पत्रकार पत्रकारीतेच्या क्षेत्रात कमी असतात त्यांना समजून घेत समाजाचे प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य ची देखील भावना सुषमा राउत यांनी व्यक्त केले . यावेळी उपस्थित पत्रकार बांधव गजानन तिडके अशोक डोईफोडे अर्जुन भाऊ आंधळे सुनील मतकर संतोष जाधव मुशिर खान कोटकर सुरज गुप्ता परमेश्वर खांडेभराड मुबारक शहा राजू पंडित पूजा कायंदे किरण वाघ उषा डोंगरे बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते
—
महीला पत्रकांरी पत्रकाराना बांधली राखी बंधुभाव जोपासला…
