****तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विजयी डंका****
देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विविध तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत विजय मिळविला असून अनेक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड निश्चित झाली आहे.
कबड्डी स्पर्धेत मुलींचा जिल्हास्तरीय प्रवेश
दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी नगरपालिका श्री शिवाजी हायस्कूल, देऊळगाव राजा येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय कला विभागातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या विजयी संघामध्ये कु. चंचल चव्हाण, तनुजा तिडके, शारदा कव्हळे, ऋतुजा वाघ, प्रांजली कोल्हे, पायल क्षीरसागर, ऋतुजा म्हस्के, भाग्यश्री जगताप, प्रतीक्षा पवार, साक्षी आमटे, रोहिणी नन्नवरे व सोनल खरात यांचा समावेश आहे.
कुस्ती स्पर्धेत विद्यार्थी विजयी
दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम ठेवले.
१४ वर्षे वयोगटातून समर्थ गजानन डोईफोडे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर १९ वर्षे वयोगटातून विशाल विकास घाडगे याने अव्वल क्रमांक मिळवून जिल्हास्तरासाठी निवड निश्चित केली.
♟️ बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी
दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी तालुका क्रीडा संकुल, देऊळगाव राजा येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील गटात अगस्त बालकृष्ण तिडके व साई विठ्ठल सोळंके विजयी झाले.
तर १७ वर्षांखालील गटात कु. हर्षदा तिडके, कु. साची चौथे, कु. गार्गी जोशी, कु. श्रेयसी पवार व कु. आर्या पऱ्हाड यांनी अव्वल स्थान मिळवले.
सत्कार व शुभेच्छा
विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या सर्व खेळाडूंचा शाळेचे प्राचार्य मा. श्री. आर. बी. कोल्हे सर, उपप्राचार्य श्री. बंड सर, पर्यवेक्षक श्री. जाधव सर व क्रीडा शिक्षक श्री. मुळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा. प्राचार्य कोल्हे सर म्हणाले की –
“शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कार रुजविणे ही आमची प्राथमिकता आहे. विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची ही यशस्वी कामगिरी आमच्यासाठी अभिमानाची बाब असून जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते नक्कीच उज्ज्वल यश संपादन करतील, याचा आम्हाला विश्वास आहे.”