16.6 C
New York
Wednesday, September 10, 2025
spot_img
spot_img

ऐन पोळ्याच्या सणात गाईला पत्रा लागून दुखापत

गाईच्या पायाला पत्रा लागून गंभीर दुखापत : पोळ्याच्या दिवशीच दुर्दैवी घटना
देऊळगाव राजा  साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस प्रशांत पंडित –
जवळच असलेल्या जळपिंपळगाव  येथील शेतकरी  विठ्ठल  काकड  आज पोळा उत्सवानिमित्त गाई बैल यांची पुजा करण्याच्या तयारीत असतानाच  गोठ्याजवळ पडलेल्या लोखंडाच्या पत्राला गाईचा जबर धक्का लागल्याने  गाय जखमी झाली ‌           शेतकरीआज पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात सुरू असतानाच गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावातील एका गाईच्या पायाला अचानक मोठा पत्रा लागून ती गंभीर जखमी झाली. अपघात इतका अचानक झाला की आसपासच्या लोकांनी गाईचा आर्त आवाज ऐकून तातडीने धाव घेतली.
गाईच्या पायाला खोलवर जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला होता. लगेचच शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी मिळून गाईला सुरक्षित ठिकाणी नेले. पशुवैद्यकांना तातडीने संपर्क साधून उपचार सुरू करण्यात आले. पशुवैद्यकीय डॉक्टर चिरफारे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोटरसायकल  वर जर पिंपळगाव गाठले  व जखमी गाईवर टीचेस  देऊन जखमेतील रक्तस्राव बंद केला. गाईची अवस्था पाहून पशुपालक व ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी आले.
पोळा हा शेतकरी आणि पशुधनाचा सण. बैल-गायांची पूजा करून त्यांचा सन्मान करण्याचा दिवस. मात्र या दिवशीच अशी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे कष्टाचे सोबती असलेल्या जनावरांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी गावात अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
गावातील काही ज्येष्ठांनी सांगितले की, “गाई-बैल हे आमचे जिवाभावाचे साथी आहेत. अशा अपघातामुळे मनस्ताप होतो. सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे.”
गावकऱ्यांनी जखमी गाईसाठी योग्य उपचार व्हावेत व लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!