मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा देऊळगाव राजा येथे उत्साहात संपन्न
देऊळगाव राजा .. साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
माणसाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे सहनशक्ती आमच्या सहनशक्तीला डीवचाळू नका आमचा अंत पाहू नका म्हणून मत चोरी रोखण्यासाठी
देऊळगाव राजा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अतिश कासारे तालुकाध्यक्ष रामदास डोईफोडे रमेश दादा कायंदे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ज्येष्ठ नेते अनिल सावजी हनीफ शहा गजानन पवार राजेश इंगळे गणेश आडे नासिर भाई जनता सेवा आयुबभाई प्रकाश राजे रवी भाऊ इंगळे अशोक डोईफोडे शेजुळ पाटील माऊली पेट्रोल पंप इरफान भाई नासीर भाई खेडेकर साहेब बी आर गवई मुन्ना ठाकूर यश कासारे दिलीप भाई खरात देविदास खरात यांचे उपस्थितीत हजारो स्पर्धकांसह संपन्न झाली.
राजेंद्रजी राख प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सैनिक मित्र फाउंडेशन कृत महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी रंजन वाघ सर भीमराव चाटे सर मातृतिर्थ स्पर्धा परीक्षा केंद्र देऊळगाव राजा येथील स्पर्धक तसेच जालना औरंगाबाद येथील स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला मुलांपैकी
प्रथम वैभव राजेंद्र शिंदे उज्जैनपुरी जालना
द्वितीय आकाश रमेश राजपूत शेंदुर्जन नानाभाऊ पाटोळे जालना
चतुर्थ ऋषिकेश शेजुळ मातृ तीर्थ अकॅडमी
मुलींपैकी प्रथम प्रियंका लालसिंग ओकसा संभाजीनगर
द्वितीय प्रतीक्षा रामभाऊ टेहळे अंबड तृतीय जना तुकाराम वायसे अंबड चतुर्थ रेणुका बोडखे मातृतीर्थ महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी प्रोत्साहन पर जयश्री भीमराव चाटे करण्यात आले
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र जी राख साहेब म्हणाले की मला अभिमान आहे देऊळगाव राजाची मॅरेथॉन स्पर्धा संभाजीनगर जालना स्पर्धाका पर्यंत पोहोचली व ते विजयी झालेत देऊळगाव राजा वासियांसोबत त्यांचं सुद्धा फार कौतुक आहे पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी व आरोग्य विभाग यांचे चांगले सहकार्य लाभले
रमेश दादा कायंदे जिल्हा सरचिटणीस यांनी आभार प्रदर्शन केले
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
