गणपती विसर्जनावेळी लहान युवराजला रडू आवरेना..
देऊळगाव राजा : साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
शहरातल्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना शनीवारी झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. विसर्जनाच्या वेळी आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभ्या असलेल्या मा.आम. डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचा नातू चि.युवराज या लहानग्या मुलाला बाप्पा जाऊ नये असे वाटत असल्याने त्याला रडू आवरेना. डोळ्यांतून अश्रू वाहत असलेल्या त्या चिमुकल्याला आजूबाजूचे लोक समजावत होते.
गणपतीचे गजर, ढोल-ताशांचा गडगडाट, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात त्या मुलाचे रडणे पाहून वातावरण भावूक झाले. “बाप्पा माझ्याकडेच राहा” अशी गोड हट्टाची त्याची हाक ऐकून अनेकांना डोळे पाणावले. शेवटी कुटुंबीयांनी समजावून घेतले असता मुलाने बाप्पाला फुलांचा हार अर्पण करून अश्रूंनी निरोप दिला.
गणेशोत्सवात भक्ती, उत्साहाबरोबरच असा भावनिक क्षण अनुभवायला मिळाल्याने उपस्थितांनीही त्या युवराज चिमुकल्याच्या निरागस भक्तीला दाद दिली. त्यावेळी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर श्रीनिवास खेडेकर सौ भाग्यश्री खेडेकर, शेखर काळे व सचिन व्यास राजेश सपाटे बंटी सुनगत गोपाल व्यास व इतर उपस्थित होते