7.7 C
New York
Tuesday, October 28, 2025
spot_img
spot_img

डॉक्टर शशिकांत खेडेकर प्रतिष्ठानच्या वतीने गरबा दांडियाचे आयोजन

शिवसेनेच्या वतीने देऊळगाव राजा शहरात गरबा-दांडियाचे आयोजन
भाग्यश्री खेडेकर यांचे लाभ घेण्याचे आवाहन

देऊळगाव राजा ….
नवरात्रोत्सवानिमित्त देऊळगाव राजा शहरात डॉ शशिकांत खेडेकर प्रतिष्ठान वतीने भव्य गरबा-दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचेशिवसेना नेत्याडॉ भाग्यश्री खेडेकर याच्या माध्यमातून 28 सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा येथे आयोजन केले असेल यासाठी 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर यादरम्यान महिलांसाठी पाच दिवसाच्या मोफत प्रशिक्षण असणार असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर भाग्यश्री खेडेकर यांनी केले आहे.

गरबा-दांडिया हा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, पारंपरिक वेशभूषेचे प्रदर्शन, तसेच पारितोषिक वितरण देखील होणार आहे.

डॉ भाग्यश्री खेडेकर यांनी सांगितले की, “अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि नवतरुणांमध्ये भारतीय परंपरेची जाणीव जागृत होते. नागरिकांनी परिवारासह या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे.”

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!