APK फाईल डाउनलोडने मोबाईल हॅकचा धोका .. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम
देऊळगाव राजा… साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
मोबाईलवर अनधिकृत स्त्रोतांमधून APK फाईल डाउनलोड केल्यास फोन हॅक होण्याचा धोका वाढतो, अशी सायबर तज्ञांची इशारा दिला आहे. अशा फाईल्समधून हॅकर्सना बँकिंग माहिती, फोटो, संदेश, कॉल डिटेल्स यावर प्रवेश मिळू शकतो.
काय करावे?
फक्त Google Play Store मधूनच अॅप्स डाउनलोड करा.
Unknown sources पर्याय बंद ठेवा.
अपच्या परवानग्या नीट तपासा.
संशयास्पद लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.
असे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी आवाहन केले आहे त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे.






