त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवर हल्ल्याचा निषेध
पत्रकार सुरक्षेचा प्रश्न — निषेधाचे निवेदन
देऊळगाव राजा ….साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने पुन्हा एकदा पत्रकार सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकशाही चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला केवळ पत्रकारांवर नसून थेट लोकशाही व्यवस्थेवरचा आघात मानला जात आहे.
स्थानिक पत्रकारांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे
की, दिनांक : 22/09/2024
्त्रंबकेश्वर येथे पत्रकांरावर हल्ला करणान्यांवर कठोर कारवाई करणे
बाबत,20 सप्टेंबर रोजी त्रंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळयाच्या पाश्वभूर्मीवर बैठकीचे
आयोजन केले होते, या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर अचानकपणे
भ्याड हल्ला करण्यात आला या हल्ल्यात योगेश खरे, अभिजित सानेवणे, आणि किरण
ताजने हे माध्यमांचे पत्रकार गंभीर जखमी झाले. सुसंस्कृत महाराष्ट्रा त अशा
पध्दतीची घटना अतिशय निंदनीय आहे, व्हाईस ऑफ मिडिया या घटनेचा तीव्र निषेध नोदवतो पत्रकारांवर हल्ला करणान्यांवर पत्रकार संरक्षक कायद्याअंतर्गत कठोरात कठोर
कारवाई करावी जेणेकरून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर पुन्हा अशा
पध्दतीने हल्ला होणार नाही या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात विशेष सरकारी वकिलांच्या
माध्यमातून खटला चालवावा आणि आरोर्पींना कठोर शासन करावे अशी आमची मागणी केली आहे पत्रकार समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न, अन्याय-अत्याचार व स्थानिक अडचणी पुढे आणण्याचे काम करतात. अशा वेळी त्यांच्या आवाजाला दाबण्यासाठी होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत.
पत्रकार संघटनांनी मागणी केली आहे की, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही तर राज्यभर पत्रकार तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
ही घटना केवळ एक मारहाण नसून लोकशाहीतील मुक्त अभिव्यक्तीवरचा थेट प्रहार आहे. शासनाने तातडीने कारवाई करून पत्रकारांचा विश्वास संपादन करणे, हीच काळाची गरज आहे. यावेळी अर्जुन आंधळे, मुशीर खान कोटकर प्रदीप भाऊ हिवाळे दिपक नागरे सुषमा राऊत सुनील मतकर खंडू मांन्टे, विलास जगताप अमोल बोबडे, पुजा कायदे जमील पठाण, चंद्रभान झीने व ईतर पत्रकार उपस्थित होते
देऊळगाव राजा पत्रकारांनी दिले त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचे निवेदन






