सिंदखेडराजा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करत सरसगट मदत जाहीर करा;..
आकाश कासारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.!
देऊळगाव राजा:-चंद्रभान जिने
सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसा पासुन मुसळधार पाऊसा मुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टी मुळे मतदार संघात ओला दुषकाळ जाहीर करुन शेतकऱ्यास सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी युवा नेते आकाश कासारे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,मागील काही दिवसाच्या पावसाचा तडाखा,व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, भाजीपाला यासह अनेक पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे, पिके उध्वस्त झाल्याने त्यांना कुठलाही उत्पन्नाचा आधार उरलेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर मंजूर करावेत, अशी मागणी केली.सध्या स्थिती परिसरात नद्या नाल्यांचे पाणी शेतात शिरले आहे या मुळे शेतातील पिके अक्षरशः पाण्यात गेली आहे. ज्यामुळे मतदार संघातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.ही सर्व गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कोणताही विलंब न करता सरकार ने मदत जाहीर करावी अशी ही मागणी करण्यात आली.निवेदनावर दीपक कासारे, आकाश कासारे,रवी पिंपळे,नासेर शाह,वसीम शाह,नितीन पिंपळे,रोहित चित्तेकर,विशाल गुप्ता,अजय खरात यांच्या सह इतर स्वाक्षऱ्या आहेत






