*भाजपचे आमदार पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक*
निदर्शने करून केला निषेध
देऊळगाव राजा :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने स्थानिक बस स्थानक चौकात कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन तीव्र निषेध व्यक्त केला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील व कुसुमताई पाटील यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज (20 सप्टेंबर) देऊळगाव राजा येते स्थानिक बस स्थानक चौकात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पडळकर यांच्या निषेधाचे बॅनर झळकत पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वारंवार जीभ घसरलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,जि. प. चे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ कोल्हे, गजानन पवार, महेश देशमुख, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे,कवीश जिंतूरकर,गजानन चेके,ख.वि.स चे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, माजी नगराध्यक्ष विष्णू रामाने, गोविंद झोरे,युवा सेनेचे तालुकाप्रमुख नितेश देशमुख, पवन झोरे, काँग्रेस पक्षाचे हनीफ शहा, योगेश आरमाळ, भास्कर बंगाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुन्हा भाजपाचे आमदार बरळले राष्ट्रवादी आक्रमक






