पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा
मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे निवेदन
देऊळगाव राजा :
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजद्रोही विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली. दरम्यान समाजकंटकांचा पत्रकारांनी निषेध नोंदविला.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात मातृत्व तालुका पत्रकार संघाच्या वतीने नमूद केले आहे की, लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारांवर हल्ले वाढत आहे. पत्रकार अभिजीत सोनवणे, योगेश खरे, किरण ताजने, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही महाराष्ट्रासाठी निंदनीय बाब आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत सदर समाजकंटका विरुद्ध विशेष सरकारी वकील यांच्यामार्फत खटला चालविण्यात यावा. जेणेकरून पुन्हा पत्रकारांवर हल्ले होणार नाही अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देताना मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा राऊत,तालुकाध्यक्ष संन्मती जैन , रमेश चव्हाण, प्रशांत पंडित, ओमप्रकाश पराड, प्रकाश साकला , राजेंद्र सोनूने , प्रभाकर मांटे,, सुरज गुप्ता,रंजीत खिल्लारे, बाबासाहेब साळवे, , शिवाजी वायाळ ,अंबादास, गुरुकुल पंढरीनाथ गीते, रवी अण्णा, वैजनाथ खंडारे, जुनेद कुरेशी,गणेश मुंढे ,व ईतर यांच्या सह्या आहेत






