अश्विन पौर्णिमेनिमित्त बौद्ध धर्मीयांचा ज्ञानदीप उजळला – त्रिपिटक ग्रंथ वाचन, ध्यान साधना, समाज एकतेचा संदेश!
देऊळगाव राजा –सुषमा राउत
स्थानिक आदर्श कॉलनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दिनांक 5 रोजी करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या मूल्यांना उजाळा देत बौद्ध धर्मीयांनी अश्विन पौर्णिमेचा पवित्र दिवस ज्ञानार्जन आणि साधनेत घालवला.
शहरातील आदर्श कॉलनी येथे बौद्ध विहारांमध्ये सकाळपासून त्रिपिटक ग्रंथ वाचन, ध्यान साधना, बुद्ध वंदना आणि प्रेरणादायी प्रवचन या उपक्रमांनी वातावरण मंगलमय झाले आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक जागरूकतेचा दीप प्रज्वलित करण्यात आला.
“ज्ञानातूनच खरा प्रकाश मिळतो,” असा संदेश सौ एडवोकेट अर्चना घेवंदे यांनी देत व ईतर वक्त्यांनी युवकांना बौद्ध तत्त्वज्ञान आचरणात आणण्याचे आवाहन केले.
संध्याकाळी दीपोत्सव, भजन व सामूहिक प्रार्थनेने परिसर उजळून निघाला. श्रद्धा, शांती आणि ऐक्याचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.बौद्धाचार्य आयु गौतम खरात यांनी बुद्ध वंदना घेतली तसेच कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सौ किरण साळवे यांनी केले तसेच एडवोकेट घेवंदे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले व शेवटी आभार प्रदर्शन सौ वंदना झोटे यांनी केले या कार्यक्रमास उपस्थित सौ साळवे सौ जिने चव्हाण सौ रजनी जाधव सौ खरात सौ जिजाबाई मोरे सौ पूजा रोठे सौ संध्या वानखेडे सौ गवई सौ जाधव बाई सौ अवसरमोल, गिराम ,त्रिशा, स्वरा ,व इतर बौद्ध उपासना उपस्थित हजर होते तसेच सुनील साळवे सर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी सर्व बौद्ध धर्मीय उपासक व उपस्थित होते
अश्विन पौर्णिमेनिमित्त बौद्ध धर्मीयांचा ज्ञानदीप उजळला






