श्री बालाजी यात्रेमध्ये पुन्हा लोकनाट्याचा झंकार गुंजणार
पत्रकारांच्या मागणीला यश
देऊळगाव राजा :
अखेर श्री बालाजी संस्थेच्या वतीने आयोजित यात्रोत्सवात लोकनाट्य सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून पत्रकार व स्थानिक कलावंत संघटनांकडून लोकनाट्याला परवानगी मिळावी अशी मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली असून, पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
श्री बालाजी महाराजांचा उत्सव हा 400 वर्षापूर्वीचा आहे आणि या चारशे वर्षापासून लोकनाट्य देऊळगाव राजा शहरांमध्ये येत असतात तालुक्यातील असंख्य खेडे त्याचबरोबर मराठवाडा विदर्भातील भाविक भक्त मोठ्या संख्येने श्री बालाजी महाराजांच्या दर्शनाला येत असत आणि हीच परंपरा अख्या महाराष्ट्रामध्ये निर्विवाद सुरू होती मात्र काही दिवसापूर्वी लोकनाट्याला काही अडचणींमुळे गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाने बंदी घातली होती याबाबत पत्रकार अर्जुन कुमार आंधळे सुषमा राऊत मुशीरखान कोटकर अशरफ पटेल यांनी याबाबत लोक नाट्य सुरू व्हावे याकरिता वारंवार प्रशासनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा केला होता व याचे निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बुलढाणा उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा पोलीस निरीक्षक देऊळगाव राजा व इतर शासकीय कार्यालयामध्ये मनोरंजन विभागात लेखी व तोंडी चर्चा व निवेदन देऊन मागणी केली होती अखेर या मागणीला यश आले आहे त्याबद्दल पत्रकारांचे कौतुक होत आहे
या निर्णयामुळे स्थानिक कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रोत्सवाच्या पारंपरिक व सांस्कृतिक सोहळ्यात लोकनाट्याचे आकर्षण पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. आयोजक समितीनेही आवश्यक नियम व अटींसह लोकनाट्य सादरीकरणासाठी परवानगी दिली आहे
अखेर लोकनाट्याचा पुन्हा झंकार दुमदुमणार
श्री बालाजी महाराजांच्या श्रद्धेचा पुन्हा अनुभव
पत्रकारांच्या एकजुटीमुळे अखेर लोककलेला न्याय — बालाजी यात्रेमध्ये संस्कृतीचा झंकार पुन्हा दुमदुमणार!






