द दोतरुणाईत टॅटू संस्कृतीचा जलवा –तिरुपती बालाजी महाराजांचे स्केच काढणारा बेरोजगार किरण गरुड ठरला चर्चेचा विषय….
श्री बालाजी महाराज यात्रेत हातावरील टॅटू काढण्याचा क्रेझ
देऊळगाव राजा…. साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस (प्रतिनिधी) – आजच्या तरुणाईला टॅटू काढण्याची भुरळ पडली असून हातावर, मानेवर, छातीवर वेगवेगळ्या शैलीतील टॅटू काढण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. या फॅशनमध्ये देशभक्ती, देवता, आई-वडिलांची नावे, तसेच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची चित्रे उमटविण्याचा नवा ट्रेंड दिसून येतो.याच पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा येथील बेरोजगार युवक किरण गरुड याने शिवसेना कार्यकर्ता राजेश सपाटे यांच्या हातावर तिरुपतीचे श्री बालाजी महाराज यांचे आकर्षक स्केच टॅटू काढले असून, त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हटके कल्पकतेमुळे किरण गरुड स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.
तरुणाईत आपली ओळख वेगळी निर्माण करण्यासाठी टॅटू हे एक नवे माध्यम बनले आहे. अनेक तरुण आपल्या आवडत्या व्यक्ती, देवता किंवा विचारांचे प्रतीक म्हणून टॅटूच्या माध्यमातून स्वतःची भावना व्यक्त करताना दिसतात.
किरण गरुड म्हणाला, “आज राजेश सपाटे यांच्या हातावर श्री बालाजी महाराज आमचे ग्रामदैवत आहे हे माझे प्रेरणास्थान व श्रद्धास्थान आहेत त्यामुळे एक ऊर्जा आम्हाला मिळते त्यांचं चित्र अंगावर काढल्याने त्यांच्या विचारांचं स्मरण दररोज होतं. तसेच एक धडाडीचे व निडर असं नेतृत्व शहरातील मुख्याधिकारी तसेच प्रशासक अरुण मोकळ सरांनी नगर विकासात केलेले काम मला भावले, म्हणून त्यांचं स्केचही मी वाढदिवसाच्या निमित्ताने काढले आहे ”
कीरण गरूड यांची हर हुन्नरी कल्पना अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, काही जणांनी त्याच्याकडून टॅटू डिझाईन करण्याची मागणीही केली आहे. गावातील व तरुण मंडळांमध्ये या “टॅटू ट्रेंड”ची जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे स्थानिक कलावंतांनाही नवीन संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






