दुभाजकावरील शुभेच्छा फलक झाले जीवघेणे
प्रशासन झोपेत!
देऊळगाव राजा … साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजकावर लावलेले दिवाळी शुभेच्छांचे भलेमोठे फलक आणि बॅनर आता अपघातांचे केंद्रबिंदू बनले आहेत. चालकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण करणारे हे फलक रात्रीच्या वेळी जीवघेणे ठरत असून कालच एका नागरिकाचा भयंकर अपघात झाला आहे.
वाहतूक विभाग आणि नगरपरिषद प्रशासन दोन्हीही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ना फलकांच्या आकारमानावर मर्यादा, ना उंची-रुंदीचे पालन! कोणालाही परवानगीशिवाय फलक लावण्याची मुभा दिल्याने संपूर्ण शहर पोस्टरबाजांनी व्यापले आहे.
“साईज किती असावी, कुठे लावावा, आणि कोणाला परवानगी आहे याचे कोणतेही पालन होत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.दिवाळीच्या नावाखाली शहराचे सौंदर्य आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बेकायदेशीर फलकांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.






