नगराध्यक्षपदासाठी चंद्रकांत खरात यांच्या सौ.बेबीताई यांना मिळणार संधी
देऊळगाव राजा…
नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या पत्नी सौ.बेबीताई यांना नगराध्यक्षपदासाठी संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू आहे. चंद्रकांत खरात हे शहरातील ओळखलेले सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर शासकीय व सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणेनगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहिल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आता नेतृत्वाची संधी मिळणे अपेक्षित आहे. शहरातील मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण, स्वच्छता आणि नागरिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत चंद्रकांत खरात यांनी केलेले योगदान उल्लेखनीय आहे.
सामाजिक कार्यातून प्रेरित होऊन सौ.बेबीताई खरात या नगरपरिषदच्या विकासाच्या वाटचालीत अग्रेसर भूमिका बजावतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे शहरासाठी सामाजिक कार्यकर्ते व शासन पुरस्कार करते चंद्रकांत खरात यांचे नाव आवर्जून घेतल्या जाते..
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या सौ बेबीताई ला मिळणार नगराध्यक्ष पदाची संधी






