5.4 C
New York
Monday, December 1, 2025
spot_img
spot_img

सर्वे नंबर 98 मधील अतिक्रमण भाजप शहराध्यक्ष दंडेल शाही

  1. देऊळगावराजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाद तापला — भाजपा शहराध्यक्ष निशिकांत  भावसार विरोधात तक्रार

    देऊळगावराजा –शहरातील दक्षिण चालीन रस्त्यावरील (डीपी रोड) अतिक्रमणावरून पुन्हा एकदा गोंधळ माजला आहे. संतोष चित्र मंदिराच्या पश्चिमेकडील भागात नगरपरिषदेच्या हद्दीत असलेला डीपी रोड काही जणांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप होत असून, अर्जदारांनी मुख्याधिकारी महोदयांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत त्या तक्रारीत शहरातील भाजप शहराध्यक्ष निशिकांत भावसार यांचे गैर अर्जदार म्हणून तक्रार दाखल केली आहेअर्जदार अर्चना भोपाल डोंगणावकर आणि प्रशांत पन्नालाल डोंगणावकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, डीपी रोडवर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना जाण्या-येण्यास अडचण निर्माण झाली आहे. सदर रस्ता पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, व विविध सरकारी कार्यालयांकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.अर्जदारांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अतिक्रमण हटविण्याचा अधिकार नगरपरिषदेला असून, त्यावर तातडीने कारवाई न झाल्यास कायदेशीर पावले उचलण्यात येतील. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनाही प्रत पाठवली आहे.दरम्यान, अर्जदारांनी नमूद केले आहे की काही गैरअर्जदारांनी रात्रीच्या वेळी परवानगीशिवाय बांधकाम सुरू करून रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने निष्क्रिय राहिल्यास कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि देवळगावराजा नगरपरिषदेतील वाढत्या वादांमुळे हा विषय आता चर्चेचा ठरला असून, डीपी रोडवरील अतिक्रमण हटविणे हा प्रशासनाच्या कर्तृत्वाचा कस पाहणारा मुद्दा बनला आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!