️ बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
बुलढाणा, …७ नोव्हेंबर:
राज्य निवडणूक आयोगाने अखेर बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मतदारांना कोणत्याही भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्रके ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, यासाठी अधिक माहितीसाठी आयोगाचे संकेतस्थळ https://mahasecelec.in सुरू करण्यात आले आहे.
निवडणुकीचा आढावा:
बुलढाणा जिल्ह्यातील ‘ब’ व ‘क’ वर्गातील ११ नगरपरिषदांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकूण ४ लाख ७६ हजार ५५८ मतदार या प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यात
- २ लाख ४२ हजार ३८८ पुरुष,
- २ लाख ३४ हजार १७९ महिला, आणि
- ११ इतर मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीत १४९ सदस्य पदांसाठी मतदान होणार






