5.3 C
New York
Monday, December 1, 2025
spot_img
spot_img

साहेब लक्ष घाला….. तुतारीचा सुमधुरता मंदावली

साहेब लक्ष घाला ….
साहेबांची तुतारी मंदावली? डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सच्चे समर्थक मेहत्रे यांचा दुसऱ्या गटात प्रवेश

देऊळगाव राजा…….
साहेब घड्याळाचे काटे बदलले, पण तुतारीच्या आवाजातील सुमधुरता मात्र कार्यकर्त्यांच्या मनातून कमी होत चालल्याचं चित्र दिसू लागलं आहे. मा.मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सिंदखेडराजा येथील सच्चे समर्थक आगामी नगराध्यक्ष पदाचे दावेदार शाम मेहत्रे यांनी अलीकडेच दुसऱ्या गटात प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
पक्षातील असंतोष, स्थानिक स्तरावरील मतभेद आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहत्रे यांच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “साहेब लक्ष घाला,” असा थेट संदेश शिंगणे गटातील जुन्या कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
राजकीय तज्ञांच्या मते, हा प्रवेश केवळ व्यक्तीगत निर्णय नसून, स्थानिक पातळीवरील नाराजीचं आणि बदलत्या समीकरणांचं स्पष्ट द्योतक आहे. पुढील काही दिवसांत आणखी काही कार्यकर्ते गटांतर करू शकतात, अशी चर्चा सुरू असून, राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!