शेतकरी कुटुंबातून नगरपालिकेच्या रिंगणात — विष्णू झोरे यांचा जनाधार वाढतोय!
देऊळगाव राजा –
- शहरातील वार्ड क्रमांक ५ मधील २२४३ मतदारांच्या प्रभागात शेतकरी कुटुंबातून आलेले, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले नेतृत्व म्हणून विष्णू अर्जुन झोरे यांचे नाव आज चर्चेत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरायचा निर्णय घेतल्याने शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
विष्णू झोरे यांनी फुले–शाहू–आंबेडकर चळवळीच्या विचारांवर आधारित सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्याचा ठसा उमटवला आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचा प्रभावी संदेश दिला असून, शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची ओळख एक प्रामाणिक, चिकाटीचा आणि कार्यक्षम नेता म्हणून निर्माण झाली आहे.
राजकीय क्षेत्रात झोरे यांचा दांडगा अनुभव आहे तुकाराम भाऊ खांडेभराड माजी नगराध्यक्ष तसेच स्व. देवानंद भाऊ कायंदे यांचा राजकीय कार्यकाळात सहवास विष्णू झोरे यांना लाभलेला आहे .त्यामुळे त्यांची राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे, २०११ साली काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले असून, सध्या ते अनेक कार्यकारी सोसायटींचे संचालक आणि उपाध्यक्ष पद भूषवत आहेत. तसेच तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
प्रभाग ५ मध्ये सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांकडून विष्णू झोरे यांना यंदाच्या निवडणुकीत ठोस पाठिंबा मिळण्याची शक्यता राजकीय व वर्तुळात व्यक्त केली जात आहे






