5.8 C
New York
Wednesday, January 14, 2026
spot_img
spot_img

३ तासात सायबर शाखेचे नितीन कासार यांनी मोबाईल शोधला

 

फक्त तीन तासांत मोबाईल शोधून काढण्याची कौतुकास्पद कामगिरी
गंभीर ॲप्स अनोळखी लिंकपासून दूर राहा—डॉ. नितीन कासार यांचे आवाहन

देऊळगाव राजा : हरवलेला मोबाईल अवघ्या तीन तासांत शोधून देत स्थानिक पातळीवर उल्लेखनीय आणि कौतुकास्पद अशी कामगिरी करण्यात आली आहे. मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून भिवगाव येथील निवृत्ती शिंदे या व्यक्तीचा फोन सुरक्षित मिळवून देण्यात यश आले असून, शहरभरातून प्रशंसा व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी मोबाईलमध्ये गंभीर, धोकादायक अॅप्स, अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या अपलोड लिंक, संशयास्पद वेबसाईट्स आणि गेम्सपासून दूर राहावे, असे डॉ. नितीन कासार यांनी आवाहन केले आहे. अशा अॅप्स किंवा लिंकमुळे सायबर हॅकिंग, आर्थिक फसवणूक, डेटा लीक होण्याचा मोठा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत त्यांनी काही सूचना केल्या—
अनोळखी लिंक कधीही उघडू नये
मोबाईलमध्ये धोकादायक गेम्स व अॅप्स डाउनलोड करू नयेत
मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी विशेष दक्षता घ्यावी
संशयास्पद अॅप दिसल्यास त्वरित हटवावे
कोणालाही अशा प्रकारची अडचण, संशयास्पद अॅप्स, हॅकिंग किंवा लिंक संबंधित समस्या आल्यास डॉ. नितीन कासार सायबर कॅफे दंदाले कॉम्प्लेक्स देऊळगाव राजा यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!