24.6 C
New York
Friday, July 25, 2025
spot_img
spot_img

जय शिवसंग्राम संघटनेचा कृषी केंद्रांना ईशारा

*शेतकऱ्यांना बियाणे व खते शासनाने ठरवलेल्या दरानुसारच वितरण करावे

. डीएपी(DAP) खताचा साठा उपलब्ध करून द्यावा

जय शिवसंग्राम संघटनेची मागणी..!*

देऊळगाव राजा…. सा.मातृतीर्थ एक्स्प्रेस..

सध्या पेरणीचे दिवस येत असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी बियाणे व खते आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांना जे कंपनीचे बियाणे व खते पाहिजे दुकानदारांनी तोच बियाणे व खते शेतकऱ्यांना वितरण करावे, तसेच शासनाने ठरवलेल्या दरानुसारच बियाणे व खते शेतकऱ्यांना द्यावे, शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्यांची कोणत्याही दुकानदारांनी पिळवणूक करू नये व शेतकऱ्यांना ज्या कंपनीचे खते पाहीजे तेच त्यांना द्यावे आणि शेतकऱ्याकडून कोणत्याही दुकानदारांनी जास्त दराने खते व बियाणे विक्री केले व शेतकऱ्यांची पिळवणूक केली तर जय शिवसंग्राम संघटना त्या दुकानदाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेईल. असे निवेदन तालुका कृषी कार्यालयत देण्यात आले, निवेदनावर स्वाक्षऱ्या

  1.  तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, राजू गव्हाणे, अनिस शाह, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, असलम खान, साजिद खान, किशोर वाघ, राजेश भाग्यवंत, आशिष मुळे, यांच्या स्वाक्षरी आहेत
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!