देऊळगाव राजा….
मातृतीर्थ एक्सप्रेस
किंग मेकर एडवोकेट नाझर काझी यांच्या आमदार कायंदे यांच्या वाढदिवस बॅनर वरील फोटो व राष्ट्रवादी चिन्ह गायब
राजकीय क्षेत्रात खळबळ
शहरात युवा नेतृत्व मनोज कायंदे यांचा 23 जून रोजी वाढदिवसा निमित्त सिंदखेडराजा मतदार संघात लावण्यात आले आहे तसेच देऊळगाव राजा शहरात देखील अनेक बॅनर शुभेच्छा बॅनर झळकत आहे यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाजेर काझी यांचा फोटो डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे
आमदार मनोज कायदे यांच्या यशामागे किंग मेकर म्हणून एडवोकेट नाजीर काझी यांनी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा विरोध पत्करून मतदारसंघात नवीन चेहरा आणण्यासाठी किंगमेकर ची भूमिका बजावली आणि आमदार मनोज कायदे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदारांना वाढदिवसानिमित्त शेकडो बॅनर झळकले मात्र एडवोकेट नाझीर काझी यांना जाणीवपूर्वक डावले आहे .एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे राष्ट्रवादीचे चिन्ह देखील गायब आहे . यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे
बॅनरवरील फोटो गायब होणे ही केवळ तांत्रिक चूक नसून, त्यामागे अनेकदा राजकीय संदेश किंवा अंतर्गत संघर्ष दडलेले असतात.
मागील काळात ठाण्यात लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते, पण अजित पवार यांचा फोटो गायब असल्याने महायुतीतील मतभेद चर्चेत आले होते.
काही वेळा ही चूक असू शकते, तर काही वेळा मुद्दामून केलेली राजकीय खेळी असू शकते.
लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार आह मा. मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्यांचे खांदे समर्थक एकेकाळी एडवोकेट नाजीर काझी यांना मानले जात होते मात्र आज सत्ता बदल आणि पक्ष बदलाने मतदारसंघात पुढील काळात अनेक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.