रेती व्यवसायिकाला खंडणी मागत कार्यलयाची तोडफोड
तिघांविरोधात गुन्हे दाखल इतरावर केव्हा होणार गुन्हे दाखल
- देऊळगाव राजा.. .. मातृतीर्थ एक्सप्रेस
देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथे शासकीय घाट सुरु केला आहे कंत्राटदार म्हणुन सरकारी अधिकृत रेती घाटाचा व्यावसायीक म्हणुन आकाश प्रभाकर घोलप हे दि.२३जुन २०२५ रोजी दुपारी १२वाजता आपल्या ऑफीस मध्ये काम करत असताना हिवरखेड ता. सिंदखेडराजा येथील काही जणांनी यामध्ये सुनिल जिजेबा गोरे, उमेश संतोष गोरे, शुभम रमेश भुसारी यांनी येऊन आकाश घोलपला एक लाख रुपयांची खंडणी ची मागणी केली.
आकाश घोलपने खंडणी देण्यास नकार देताच सुनिल जिजेबा गोरे, उमेश संतोष गोरे, शुभम रमेश भुसारी व इतर 10 ते 15 जणांनी खिडकीची तोडफोड करीत आफीसमध्ये घुसून तोडफोड केली तसेच सुनिल जिजेबा गोरे यांच्या हातात चाकु तसेच उमेश संतोष गोरे व शुभम रमेश भुसारी यांच्या हातात लोखंडी रॉड होते. या तिघांनी आकाश घोलपला चाकुचा धाक दाखवत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली तसेच खिश्यातील एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आणि चाकुचा धाक दाखवतजर आम्हाला तु दर महिन्याला आम्हाला एक लाख रुपयांची खंडणी मागणी केली. न दिल्यास तुझा खुनी पाडल्या शिवाय राहणार नाही अशी धमकी एवढेच नव्हे तर यातील तिघांनी सुनिल जिजेबा गोरे, उम `श संतोष गोरे, शुभम रमेश भुसारी व इतर 10ते 15जणांनी ऑफीस मधील साहित्याची तोडफोड करीत सीसीटीव्ही कॅमेरांची सुध्दा तोडफोड केली. जिव वाचविण्याच्या भितीने आकाश घोलपने आरडाओरडा केला असता बाजुला काम करणारे रामदास निकम, गणेश वनवे, अभिषेक देशमुख, अंकुश देशमुख व गुलाब लेहनार हे घटनास्थळी आल्याचे पाहताच यातील आरोपी सुनिल जिजेबा गोरे, उमेश संतोष गोरे, शुभम रम `श भुसारी यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.यावरुन अंढेरा पोलिसांनी आकाश घोलप यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल जिजेबा गोरे, उमेश संतोष गोरे, शुभम रमेश भुसारी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम ३०९ (६), ३०८ २), ३२४(२), ३५१ (३), ३ (५), गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जारवलकरीत आहे.