SDM साहेबांच्या हातून मिळालं ‘गुरुपौर्णिमेचं’ खास स्नेहपत्र!
देऊळगाव राजा …..मातृतीर्थ एक्सप्रेस
– प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं खरं मूल्यमापन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादातून व गौरवातून मिळतं. हे अगदी खऱ्या अर्थाने सिध्द झालं ते आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी.
स्थानिक प्रशासनात कर्तव्यदक्षतेनं कार्य करणाऱ्या पत्रकार तथा शासकीय विभागातील सहकाऱ्याला आज उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्या हस्ते एक खास हस्तलिखित पत्र देऊन गौरव करण्यात आला. “तुम्ही समाजासाठी आणि कार्यालयासाठी ज्या निष्ठेने काम करता, तीच खरी सेवा” असा आशय असलेल्या या पत्रात त्यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक करण्यात आले.
हा क्षण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. आपण ज्या अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, ते आपल्यावर विश्वास ठेवतात, ही गोष्टच खूप मोठा आत्मविश्वास देणारी आहे, अशा भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
गुरुपौर्णिमा हा दिवस गुरू-शिष्य परंपरेचा सन्मान करणारा असतो. मात्र एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं आपल्या सहकाऱ्याला अशा शब्दात शुभेच्छा देणं, ही बाब समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.