7.2 C
New York
Thursday, January 15, 2026
spot_img
spot_img

गणपती उत्सवात उत्कृष्ट गणेश मंडळांना पारितोषिक स्पर्धा

 

*गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा*

∆ प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

बुलढाणा, दि. 27: सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणारी ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होईल. रीलसाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील बनविणे अपेक्षित आहे.

महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 15 हजार, तृतीय पारितोषिक 10 हजार, उत्तेजनार्थ विजेत्यास 5 हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून 75 हजार रुपये, तृतीय पारितोषिक म्हणून 50 हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून 25 हजार रुपये देण्यात येईल. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपये, उत्तेजनार्थ म्हणून 25 हजार रुपये देण्यात येतील.

  • स्पर्धेच्या नोंदणीकरिता गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे, असे दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून कळविण्यात आले आहे.
    00000
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!