: धनगर जमातीला बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून एस टी आरक्षणाची अमलबजावणी करुन दिपक बो-हाडे, यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवा
धनगर समाजाच्या वतीने निवेदन
- देऊळगाव राजा…..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जन-समुदयाला उपोषणकर्तेसह सबोधित करतांना म्हणाले होते की, माझा धनगर एस.टी. आरक्षणा बाबतीत फार अभ्यास झाला असुन या बाबत माझ्याकडे धनगर एस.टी आरक्षण बाजुने पुष्कळ असे पुरावे आहेत. आता पर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मता पुरता वापर केलेला आहे. तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धनगर एस.टी. आरक्षणाची अमंलबजावणी करतो.
असे आश्वासन दिलं होते मात्र
आज पर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मिटींग झाल्या, शेकडो आदोंलन झाले तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून आमचे बांधव दिपक बो-हाडे दिनांक १७/९/२०२५ पासुन नियोजीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुली, जालना येथे उपोषणास बसले आहे. आज त्यांचा उपोषणाचा ६ वा दिवस आहे. अजून पर्यंत आपण या उपोषणाची/आंदोलनाची दखल घेतली नाही. आपण २ दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटनादत्त एस.टी. आरक्षणाची अमलबजावणी करुन दिपक बो-हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे, अन्यथा दिपक बो-हाडे सागंतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील.
तसेच दिपक बो-हाडे यांच्या जीवतास काही बरे-वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील,
सकल धनगर समाजाच्या वतीने दिला आहे यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, जवळखेड चे माजी सरपंच प्रभाकर सोरमारे, नामदेव बोंबले, गजानन जोशी, नामदेव खंडागळे पवन पन्नासे, आदित्य चोपडे, आकाश वैद्य, अनील बकाल यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होता






