साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस मध्ये भाजपाच्या शहराध्यक्ष पदासाठी च्या इच्छुकांची नावे व अंतर्गत कलह बाबत बातमी छापताच भाजपाने तात्काळ दखल घेऊन शहराध्यक्ष पदासाठी निशिकांत भावसार यांची निवड करण्यात आली…
भाजपाने शहराध्यक्ष पदासाठी निशिकांत भावसार यांची निवड केली
देऊळगाव राजा ..साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस
नगरपालिकेत शहराध्यक्षपद रिक्त असताना, भाजपाने निशिकांत भावसार यांची शहराध्यक्ष पदासाठी निवड केली आहे. ही निवड घ्या-घोषीत होताच नगरपालिकेच्या राजकीय व प्रशासकीय वातावरणात हलचाल दिसून येऊ लागली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे, तर नागरिकांमध्ये नवीन नेतृत्वाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. निशिकांत भावसार यांनी नियुक्तीनंतर म्हटले की, “नगरपालिकेतील विकासकामे वेळेत पार पाडली जातील, नागरिकांना सुविधा मिळवून देण्यात प्राधान्य दिले जाईल.”
या निर्णयामुळे नगरपालिकेतील कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल आणि आगामी उपक्रमांना गती मिळण्याची शक्यता आहे.
साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या बातमीची भाजपाने घेतली दखल






