लिलावा द्वारे जागेचे वाटप करून परंपरेला फाटा
श्री बालाजी महाराज संस्थान विरुद्ध व्यवसायिकांचा रोष
देऊळगाव राजा : सुमारे साडेतीनशे वर्षाच्या धार्मिक व ऐतिहासिक परंपरेला फाटा देण्याचे कार्य प्रशासनासह श्री बालाजी महाराज संस्थान द्वारे केल्या जात असून श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवामध्ये वर्षानुवर्षीपासून येणाऱ्या व्यवसायिका मध्ये रोष निर्माण झाला आहे. राजकीय हस्तक्षेपाला बळी पडून यात्रा उत्सव समितीने परंपरागत उत्सवाला एक प्रकारे छेद देण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याची चर्चा आहे. या गैरप्रकारा निषेधार्थ पारंपारिक व्यवसायिकांनी हरकतीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
येथील श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून संपूर्ण उत्सव परंपरागत पद्धतीने साजरा केल्या जात असतो. सुमारे साडेतीनशे वर्षाच्या श्री बालाजी यातून उत्सवाच्या परंपरे नुसार यात्रोत्सवात आपली व्यवसाय फाटणाऱ्या व्यवसायिकाकडून कुठल्याही पद्धतीचे कर आकारल्या जात नाही. विनामूल्य व्यवसायिकांना दुकाने लावण्याचा अधिकार देणारे ही एकमेव यात्रा उत्सव आहे. तरीपण श्रद्धेपोटी काही व्यवसायिक बालाजी महाराज संस्थानला देणगी म्हणून कानगी अर्पण करतात. मात्र यावर्षी या परंपरेला फाटा देऊन प्रशासन आणि बालाजी संस्थान ने यावर्षी यात्रोत्सवामध्ये येणारे मनोरंजनाची साधने रहाटपाळणे यांना जागेसाठी जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरुद्ध वर्षानुवर्षीपासून यात्रा उत्सवामध्ये आपले व्यवसाय करणाऱ्या एनओसी धारकांनी जाहीर लिलाव पद्धतीला विरोध दर्शविला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ऐनवेळी लिलावाद्वारे जागावाटप करण्याची परंपरा व्यवसायिकांवर लादून अनेक वर्षापासून यात्रा उत्सवामध्ये येणाऱ्या व्यवसायिकांवर अन्याय आहे. दरवर्षी दसऱ्याच्या एक दिवस अगोदर व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येत होती मात्र यावर्षी ऐन ललिताच्या तोंडावर जागावाटप करण्यासंदर्भात प्रशासनाला जाग आला आहे. त्यातच पारंपारिक पद्धतीने जागा वाटप न करता लिलावा द्वारे रहाटपाळन्यांची जागा वाटप करण्याचा तुगलकी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवून शासनाने परंपरेनुसार जागावाटप करावी अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे. व्यवसायिकांवर अन्यायकारक लिलाव लादणाऱ्या श्री बालाजी संस्थान व प्रशासना विरुद्ध व्यवसायिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे.