7.2 C
New York
Thursday, January 15, 2026
spot_img
spot_img

फेसबुक वर महिलांबाबत आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

फेसबुकवरील अपमानजनक पोस्टविरोधात माळी समाजाचा संताप —  विरोधात भाषने निषेध, कठोर कारवाईची मागणी
देऊळगावराजा….
माळी  समाजातील महिलांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह, अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या दत्ता कायंदे या व्यक्तीविरोधात समाजाचा रोष उफाळून आला आहे. समाजातील नागरिकांनी देऊळगावराजा पोलिस ठाण्यात धडक देत लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी  केली आहे. या मागणीचे निवेदन ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले
   तक्रारीनुसार,  दत्ता कायंदे याने सोशल मीडियावर महिलांविषयी अवमानकारक शब्द वापरून पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमुळे समाजातील महिलांचा सन्मान धुळीस मिळाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
याप्रकरणी उपस्थितांनी निषेध व्यक्त करीत भावना भावना व्यक्त केल्या आमदार मनोज कायंदे यांची प्रतिनिधी सतीश कायंदे डॉक्टर सुनील कायंदे दीपक बोरकर राजेश इंगळे सदाशिव मुंडे ,व ई इतरांनी माळी  समाजा सोबत उभे राहत तीव्र निषेध व्यक्त केला असून, “महिलांचा अवमान सहन केला जाणार नाही; पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास समाज रस्त्यावर उतरेल,” असा इशारा दिला आहे.
तक्रारीसोबत संबंधित फेसबुक अकाउंटचे स्क्रीनशॉट तसेच 4 WhatsApp क्रमांकांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तक्रारीवर यांसह अनेकांनी स्वाक्षऱ्या करून समाजाच्या एकतेचा निर्धार दाखवला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्याची खात्री देत तपास सुरू केल्याचे सांगितले आहे. समाजातील नागरिक मात्र “अपमान करणाऱ्याला शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत आहेत. सर्व समाज बांधवांनी तसेच सर्व पक्षांनी या पोस्ट बाबत निषेध व्यक्त करीत सदर इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर शेकडो सह्या आहेत.  गणेश डोके  दीपक बोरकर , प्रदीप हिवाळे मुशीरखान कोटकर सुषमा राऊत, राजेश खांडेभराड सुबोध बोराटे प्रकाश खांडेभराड मंगेश तिडके प्रवीण झोरे मनोज खांडेभराड योगेश खांडेभराड बंडू झोरे किशोर खांडेभराड एडवोकेट सचिन आंधळे अरविंद खांडेभराड अशोक अंभोरे गजानन टकले फुलझाडे वाघ वनवे खरात वाघमारे पंडित प्रभाकर खांडेभराड सौ पूजा खांडेभराड व इतर सर्व समाज बांधव उपस्थित होते.
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!