5.3 C
New York
Monday, December 1, 2025
spot_img
spot_img

डॉ रामप्रसाद शेळके यांच्या फोटोच्या वादाने राष्ट्रवादीमधे दुफळी

 बॅनर फोटोवरून पुन्हा वाद पेटला; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात धूसफूस, ज्येष्ठ नेत्यांना डावलले!
डॉक्टर रामप्रसाद शेळके यांचा फोटो नसल्याने राष्ट्रवादीमध्ये दुफळी
देऊळगाव राजा…
शहरात पुन्हा एकदा बॅनरवरील फोटोच्या वादाने राजकीय तापमान चिघळले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये अंतर्गत नाराजी, दुर्लक्ष आणि गटबाजीची चिन्हं प्रकर्षाने समोर येत आहेत.
अलीकडेच काही ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर ज्येष्ठ नेत्यांचे फोटो गायब असल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली. शहरातील अनेक ठिकाणी बॅनर लावणाऱ्यांनी फक्त काही ठरावीक नेत्यांचेच फोटो झळकवल्याने जुने, निष्ठावान कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांना डावलल्याची भावना निर्माण झाली आहे. यामध्ये डॉक्टर रामप्रसाद शेळके यांचे एक वेगळं नेतृत्व आहे राजकारणातील एक नाव आहे जेष्ठ नेते असल्याने डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी मंत्री यांचे खंदे समर्थक असल्याने या चर्चा व ही गढवाच प्रकर्षण आणि समोर आली आहे
जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली होती त्यादरम्यान शहरातील शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावली होती त्यावरून अंतर्गत गटबाजीला उधान आले आहे
पक्षातील काही कार्यकर्त्यांनी “हे पद्धतशीर दुर्लक्ष नसून गटबाजीचे दर्शन आहे,” अशी टीका केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटातील एकोपा हरवला जात असल्याचेही बोलले जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, अशा प्रकारचे वाद हे फक्त फोटोपुरते मर्यादित नसून नेतृत्वात उभी फूट दिसू लागल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
दरम्यान, या विषयावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!