श्री बालाजी महाराजांच्या जागेवरील अतिक्रमण प्रकरणात खळबळ — भाजप पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषदेनंतर स्वतःच अतिक्रमण काढले!
देऊळगाव राजा….
शहरातील श्री बालाजी महाराजांच्या जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापले आहे. या संवेदनशील जागेवर भाजप पदाधिकारी निशिकांत भावसार यांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता.
याच संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित होताच, संबंधित पदाधिकाऱ्याने अनपेक्षित पाऊल उचलत स्वतःच पत्र्याचा शेड उपटून अतिक्रमण काढून टाकले.
या कृतीने नागरिकांमध्ये कौतुकाची लाट असली तरी, राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप पदाधिकाऱ्याच्या या वादग्रस्त कृतीमुळे पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे.
शहरातील धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, नागरिकांनी प्रशासनाकडे “अशीच तातडीची कारवाई सर्वांवर व्हावी” अशी मागणी केली आहे.






