सामाजिक पत्रकारितेतून पुढे आलेले व्यक्तिमत्व — पत्रकार अशरफ पटेल यांना नगरसेवक म्हणून संधी मिळण्याचे संकेत
देऊळगाव राजा….
शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवे आणि आशादायक नाव समोर आले आहे — पत्रकार अशरफ पटेल. अनेक वर्षे सामाजिक पत्रकारितेतून जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारे, अन्यायाविरुद्ध लेखणी चालवणारे अशरफ पटेल आता नगरसेवक पदासाठी संधी मिळण्याचे संकेत दिसत आहेत.
सामाजिक प्रश्न, नागरी सुविधा, प्रशासनातील त्रुटी यावर सातत्याने प्रकाश टाकत त्यांनी सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. पत्रकारितेतून जनतेसाठी झटणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, त्यामुळेच त्यांना नगरसेवक म्हणून जबाबदारी देण्याचा विचार स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे. वार्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढण्यासाठी ते आता सज्ज झाले आहे आणि असंख्य पत्रकारांचा जमाव आणि पाठबळ त्यांच्या पाठीमागे आहे
मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रमुख पक्षांकडून अशरफ पटेल यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे. मात्र त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षाशी बांधिलकी जाहीर केलेली नाही. “मी पक्षापेक्षा जनतेशी बांधील आहे,” अशी भूमिका त्यांनी आपल्या निकटवर्तीयांपुढे मांडल्याचे समजते.
सामाजिक पत्रकारितेत त्यांच्या तटस्थ आणि प्रखर भूमिकेमुळे निर्माण झालेला नावलौकिक आज त्यांना राजकारणात प्रवेशाचे दार उघडून देत आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात चर्चेला वेगळे वळण लागले असून, पत्रकारितेतून लोकप्रतिनिधित्वाच्या दिशेने जाणारा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आश्रम पटेल हे पत्रकारितेत एक नाव आहे व पत्रकार संघाचे देखील नाव फार मोठ्या प्रमाणात अत्यंत कमी वेळात नावलौकिक केले आहे . पत्रकार संघासाठी आदर्श पत्रकारिता पुरस्कार देखील त्यांच्या कार्यकाळात संघाला मिळालेला आहे हे एक विशेष…
पत्रकार आशरफ पटेल यांना नगरसेवक पदी विराजमान होण्याचे संकेत






