8.5 C
New York
Tuesday, January 13, 2026
spot_img
spot_img

एड. अनिल शेळके वार्ड नंबर ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल

  • वॉर्ड क्रमांक ७ ऍड. अनिल शेळके नगरसेवक पदासाठी नशीब आजमावत

देऊळगाव राजा –

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. वॉर्ड क्रमांक सातमध्ये आता एक नवं समीकरण तयार होत असून, या वॉर्डातून एडवोकेट अनिल शेळके यांनी नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
वकीली व्यवसायातून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत. कायदेविषयक मार्गदर्शन, सामाजिक प्रश्नांवरील सक्रिय भूमिका आणि पारदर्शकतेवर भर हे त्यांच्या कामाचे विशेष वैशिष्ट्य राहिले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये आपुलकीचा आणि विश्वासाचा सेतू बांधला आहे.
ऍड. अनिल शेळके यांनी सांगितले की, “नगरसेवक झालो तर माझं पहिलं प्राधान्य नागरिकांच्या अडचणी दूर करणं, व्यवस्थापण यावर भर देणं असेल. विकासासाठी एकसंघ प्रयत्न करणे हेच माझं ध्येय आहे.”
स्थानिक तरुण आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता त्यांच्या या निर्णयाचे स्वागत अनेकांनी केले आहे. निवडणुकीत त्यांचा सहभाग आल्याने वॉर्ड क्रमांक ७ चुरस अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!