7.9 C
New York
Thursday, January 15, 2026
spot_img
spot_img

हि निवडणूक गद्दारांसोबत नाही…..‌ छगन दादा मेहत्रे

गद्दारांसोबत आघाडी नाही – पक्षप्रमुखांचा ठाम निर्णय

वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी व आम आदमी पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा
देऊळगाव राजा ….
स्थानिक मातोश्री सभागृहात शिवसेना( उ.भा.ठा.)व भारतीय काँग्रेस पार्टी यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली . शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन दादा महेत्रे यांनी गद्दार सोबत युती नाही असा आदेश पक्षप्रमुखाचा असल्याने आम्ही गद्दारासोबत गेलो नाही. श्री महेत्रे यांनी यांनी स्पष्टपणे जाहीर केले की “गद्दारांसोबत कोणतीही आघाडी किंवा युती केली जाणार नाही. जनतेशी केलेला विश्वासघात आम्ही कधीच मान्य करणार नाही.”तसेच ही निवडणूक गद्दारांसोबत नाही हे स्पष्ट केले .

महाविकास आघाडीस वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आम आदमी पार्टीने अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला आहे. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अधिक मजबूत होत असल्याचे दिसत आहे.

यावेळी छगन दादा मेहेत्रे म्हणाले की, “सर्व समाजाला न्याय देणे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जे नालायक येथे ठरले, त्यांना तिथे जाऊन लायक म्हणावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे. पण जनता सर्व पाहते आणि निर्णयही जनता देते.”
पत्रकार परिषदेत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांचे प्रमुख नेते ठणकावले आम्ही गद्दारासोबत राहणार नाही उमेदवार व नगराध्यक्ष पदाची यादी जाहीर केली . १५मशाल चिन्हावर तर ३ कांग्रेस या जागेवर निवडणूक लढवत आहे एका ठिकाणी अपक्षाला सोबत घेतले आहे .
[बहुजन वंचित आघाडीच्या राज्याच्या नेत्या सविताताई मुंडे यांनी आपली भूमिका मांडताना वंचित चा उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने आम्ही फुले शाहू आंबेडकर विचाराच्या विचारसरणीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरविले आहे . बहुजन वंचित आघाडीच्या मतदारांनी शोभा कासारे ताई यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे ‘ असे आव्हान करताना बौद्धांनी येणाऱ्या निवडणुकीत बौद्धांना उमेदवारी न देणाऱ्या नेत्यांना जागा दाखवण्याची गरज आहे असे सविता मुंडे ताई यांनी आवाहन केले .] यावेळी उपस्थितीत संपर्कप्रमुख छगन दादा मेहत्रे  वंचित बहुजन आघाडीच्या सविता तई मुंडेमाजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे माजी नगरसेवक वसंताप्पा खुळे काँग्रेसचे  रमेश दादा कायंदेअनिल सावजी रामदास डोईफोडे महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ आत्माराम दादा आकाश कासारे अजय शिवरकर व इतर बहुसंख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!