देऊळगाव राजा …..
अस्सल सोने असल्याचे भासून 12 हजारात पाच गिन्या विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी दि 27 बस स्थानक परिसरातून अटक केली आरोपी कडून पोलिसांनी 852 नकली सोन्याच्या गिन्या जप्त केल्या आहेत याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मनोज कुमार पांडे उत्तर प्रदेश या व्यक्तीस आरोपींनी 12,000 सोन्याच्या पाच गीन्या विकत दिले मात्र सदर शिक्के हे नकली आहे.
आपली फसवणूक झाली अस्सल म्हणून बनावट सोन्याच्या गिन्नांना देऊन आरोपींनी आपल्या गंडविल्याचे लक्षात येताच मोहित पांडे यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले दरम्यान प्रभारी ठाणेदार रोही यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भरत चिरडे यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस स्थानक परिसरातून दोघा आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याकडून सोन्याच्या नकली 852 गीन्या जप्त करण्यात आल्या असून मोहित मनोज कुमार पांडे वय 25 धंदा पेट्रोल पंप राहणार पिंपरी तालुका मिस्त्रीक जिल्हा सीतापुर उत्तर प्रदेश यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी देवानंद बबन पवार व विजय भोसले दोघे राहणारे दुसरबीड तालुका सिंदखेडराजा यांच्याविरुद्ध फसवणुकीची.
अप क्र -225/2025 कलम 318 (4), 3 (5) bns गुन्हा नोंदवून अटक केली आहे सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भरत चिरडे तपास करीत आहेत यापूर्वी सन 4/5 वर्षांपूर्वी देऊळगाव राजा पोलिसांनी नकली सोन्याच्या गिरण्या विकण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक केली होती त्या प्रकरणात ही सदर आरोपींचा समावेश होता अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे