19.4 C
New York
Wednesday, September 10, 2025
spot_img
spot_img

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम . गृहभेट विद्यार्थी भेट बक्षीस योजना आदर्श शिक्षक पुरस्कार गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची माहिती

देऊळगाव राजा ..

पंचायत समिती देऊळगांव राजा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम १ जुन ते ३० जुन २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार श्री. मनोजभाऊ देवानंद कायंदे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात, शिक्षणाधिकारी प्राथमिक .श्री.बी.आर. खरात यांचे मार्गदर्शनाखाली, गटविकास अधिकारी श्री. मुकेश माहोर व गटशिक्षणाधिकारी श्री. दादाराव मुसदवाले यांनी यांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले असुन जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्या वाढविणाऱ्या पहिल्या ५ शाळांना बक्षिस तसेच पटसंख्या वाढविणाऱ्या इतर सर्व शाळांच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येईल

सर्वात जास्त पटसंख्या वाढविणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिफारस करणे तसेच दि १ ते ७ जुन २०२५ या काळात गृहभेटी करून बाहेर शिकायला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांच्या सभा घेवून शाळेच्या उपक्रमाची व गुणवत्तेची माहिती देवून या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करून घेणे गटशिक्षणाधिकारी यांनी व्हिडीओ व्दारे सर्व पालकांना या बाबत आवाहन केले असुन सर्व शाळा असे व्हिडीओ तयार करून गावात प्रसारीत करतील गांवातील ग्रामपंचायत, तंटामुक्ती समिती, शाळा व्यवस्थापन समिती व तरूण मित्र मंडळ यांचे माध्यमातुन जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्या बाबत नियोजन करण्यात येत आहे.

सर्व शाळा २३ जुन रोजी सुरू होणार असून शाळा प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल.
(आपल्या जवळची उत्तम दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा :- मुकेश माहोर, गटविकास अधिकारी, प.सं. दे. राजा.)

(या वार्षी पासुन ईयत्ता १ ली मध्ये CBSC चा अभ्यासक्रम सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा असे दादाराव मुसदवाले, गटशिक्षणाधिकारी यांनी आवाहन केले आहै …

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!