देऊळगाव राजा… प्रतीनीधी: मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुनकुमार ठोसर यांची आज सदिच्छा भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर खडकपूर्णा धरणाला “संत चोखासागर खडकपूर्णा धरण” हे नामकरण मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान देणारे प्रा. कमलेश खिल्लारे यांचीही पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सस्नेह भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विषयांवर चर्चा झाली.

या प्रसंगी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा राऊत, अध्यक्ष प्रशांत पंडित, सचिव जुनेद कुरेशी, राजू पंडित, किशोर जमदार, मो. अहमद, शंकर शिवारकर, क्षितिज दर्जे तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





