28.4 C
New York
Friday, August 7, 2026
spot_img
spot_img

अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्ताने निमंत्रण पत्रिकेतील नगराध्यक्षाच्या प्रोटोकॉलच्या चर्चेला उधान

आरोग्य शिबिराच्या निमंत्रणपत्रिकेत प्रोटोकॉलला फाटा?
नगराध्यक्षांचे नाव प्रोटोकॉलनुसार वरच्या मान्यवरांमध्ये नसल्याने चर्चांना उधाण
देऊळगाव राजा | प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जवळखेड येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या निमंत्रणपत्रिकेवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निमंत्रणपत्रिकेत देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. माधुरीताई तुषार शिंगणे यांचे नाव असले तरी, प्रोटोकॉलनुसार प्रमुख मान्यवरांच्या वरच्या यादीत त्यांचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याने विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिकेत लोकप्रतिनिधींना प्रोटोकॉलनुसार स्थान दिले जाते. त्यामुळे नगराध्यक्षांचे नाव प्रमुख मान्यवरांच्या यादीत वर नमूद न केल्याने हा प्रोटोकॉलचा भंग आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयोजकांकडून याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून, निमंत्रणपत्रिकेच्या मांडणीवरून राजकीय व सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मात्र शिबिरापेक्षा निमंत्रणपत्रिकेतील प्रोटोकॉलनुसार मान्यवरांची नावे न मांडल्याचा मुद्दाच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!